जागतिक किडनी सप्ताहानिमित्त घाटकोपर स्थानकावर जनजागृती
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) : जागतिक किडनी सप्ताहानिमित्त घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात किडनी आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. सिद्धार्थ लखानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंडियन मेडिकल असोसिएशन एनईबीएस शाखेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिराचे आयोजन डॉ. देवांशी लखानी, आयएमए एनईबीएस शाखेचे अध्यक्ष डॉ. हरीश पांचाल आणि डॉ. दर्शना दोशी यांनी केले. या वेळी प्रवासी व नागरिकांना किडनीचे आरोग्य जपण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उच्च रक्तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवणे, पुरेसे पाणी पिणे, अनावश्यक वेदनाशामक औषधांचा वापर टाळणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. किडनीच्या आजारांचे वेळेत निदान आणि योग्य जीवनशैलीमुळे दीर्घकालीन किडनी विकारांचे प्रमाण कमी करता येते, असा संदेश या शिबिरातून देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.