मुंबई

चित्रपटांत पोलिसांचे नकारात्मक चित्रण थांबवा

CD

मुरबाड, ता. १० (वार्ताहर) : चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये पोलिस विभागाचे नकारात्मक चित्रण केल्यामुळे समाजात पोलिसांविषयी चुकीचा संदेश जात असल्याची तक्रार मुरबाड येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश घरत यांनी केली आहे. अशा दृश्यांवर नियंत्रण ठेवून आवश्यक ती बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात अनेक चित्रपट व मालिकांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांना भ्रष्ट किंवा गुन्हेगारांशी संगनमत करणारे दाखवले जाते. त्यामुळे पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात खराब होत असून, नागरिकांमधील पोलिसांविषयीचा आदर कमी होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पोलिस दल दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असते. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत असताना मनोरंजनाच्या नावाखाली त्यांची बदनामी होईल, अशा दृश्यांचे चित्रण टाळावे, अशी मागणी घरत यांनी केली आहे. तसेच चित्रपट व मालिकांवर योग्य सेन्सॉर तपासणी करून आवश्यक नियमावली लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारने या मागणीवर सकारात्मक विचार करून पोलिस दलाची प्रतिमा जपण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षा रमेश घरत यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT