मुंबई

‘संगीत विशारद’ महिला म्हणून शितल बेदडे यांचा सन्मान

CD

पहिल्या ‘संगीतविशारद’ महिला म्हणून शीतल बेदडे यांचा सन्मान

जव्हार, ता. १० (बातमीदार) : ग्रामीण भागात जिद्द, मेहनत आणि कलेवरील निष्ठेच्या बळावर यशाचे शिखर गाठणाऱ्या शीतल साईनाथ बेदडे यांनी ‘संगीतविशारद’ (गायन) ही पदवी संपादन करून जव्हार-मोखाडा परिसरातील पहिल्या महिला म्हणून मानाचा बहुमान मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे यश जव्हार व मोखाडा भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मूळच्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील असलेल्या शीतल बेदडे यांना लहानपणापासूनच चित्रकला आणि गायनाची विशेष आवड होती. बालपणापासून त्यांनी संगीताचे धडे घेतले. २०१५ साली त्यांचे लग्न मोखाडा तालुक्यातील बेदडे कुटुंबात झाले आणि पतीच्या नोकरीनिमित्त त्या जव्हार येथे स्थायिक झाल्या. ग्रामीण भागात उच्च संगीत शिक्षणाची सुविधा नसतानाही त्यांनी हार न मानता वसई येथील गुरू संगीत महाविद्यालयातून ऑनलाइन माध्यमातून सातत्याने अभ्यास करीत ‘संगीतविशारद’ पदवी प्रथम श्रेणीत मिळवली.
जव्हार परिसरातील गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी भजने, भक्तिगीते आणि सुगम संगीत सादर केले आहे. ‘स्वरसाज’ या संगीत समूहातूनही त्यांनी अनेक कार्यक्रमांत सहभाग घेतला आहे. या यशामागे माझे आई-वडील, सासू-सासरे, पती तसेच गुरूंचे मार्गदर्शन आणि परिसरातील संगीतप्रेमींचा मोठा पाठिंबा आहे, असे शीतल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT