मुंबई

महानिर्मितीकडून विक्रमी ११४५२ मेगावॅटची वीज निर्मिती

CD

महानिर्मितीकडून ११,४५२ मेगावॉटची विक्रमी वीजनिर्मिती
- सर्व २८ औष्णिक वीजनिर्मिती संच कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : उन्हाचा तापलेला पारा आणि वाढलेल्या उकाड्यामुळे राज्याच्या विजेच्या मागणीने ३० हजार मेगावाॅटचा टप्पा ओलंडला आहे. त्या पार्श्वभूमीवर वाढलेली ही विक्रमी मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीने सोमवारी ११ हजार ४५२ मेगावाॅट एवढी विक्रमी वीजनिर्मिती केली आहे. त्यासाठी महानिर्मितीने सर्व २८ औष्णिक वीज संच कार्यान्वित करत हा टप्पा गाठला आहे.
सोमवारी मुंबईसह संपूर्ण राज्याची ३० हजार ४०० मेगावाॅट एवढी विजेची मागणी नोंदली आहे. मुंबईत बेस्ट, अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पाॅवरकडून वीज वितरण केले जाते, तर मुंबई वगळता संपूर्ण राज्यभरात महावितरणकडून वीज वितरण केले जाते. सध्या तापमानाचा पारा ३२ अंशाच्या पुढे गेला आहे. औद्योगिक आणि कृषी पंपधारक वीजग्राहकांचा विजेची मागणी कायम असतानाच एसी, पंखे, कूलरचा वापर वाढला आहे. त्यामुळे सोमवारी राज्याची विजेची मागणी उच्चांकी टप्प्यावर पोहोचली होती. ती पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीने आपल्या कामगिरीत सातत्य राखतानाच आतापर्यंतची सर्वाधिक वीजनिर्मिती केली आहे. महानिर्मितीने मागील काही काळामध्ये सातत्याने वीजनिर्मितीमध्ये नवनवीन विक्रम स्थापित केले आहेत. याच कालावधीत महानिर्मितीच्या कोयना जलविद्युत प्रकल्प तसेच अन्य लघु जलविद्युत प्रकल्पामधील वीजनिर्मिती संच आणि उरण वायू वीजनिर्मिती केंद्र याद्वारे गरजेनुसार वीजनिर्मिती करून मागणी पूर्ण केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
महानिर्मितीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., संचालक (संचलन) अभय हरणे यांच्यासह महानिर्मितीच्या टीमचे कौतुक केले आहे. दरम्यान, महानिर्मितीच्या सर्व अधिकारी-कर्मचारी, अभियंते आणि तंत्रज्ञांच्या समर्पित व अथक प्रयत्नांमुळेच स्थापित क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून राज्यातील जनतेला दिलासा देणे शक्य झाले आहे. पुढील काळातही कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महानिर्मिती आपले योगदान आणखी चांगले देईल, असे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT