उल्हासनगर, ता. १० (बातमीदार) : उल्हासनगरातील १७ सेक्शन टेकडी परिसरातील विद्युत ट्रान्स्फार्मरला मध्यरात्री आग लागल्याने परिसरातील नागरिकांना तब्बल १४ तास अंधारात राहण्याची वेळ आली. या घटनेमुळे रात्रभर आणि पुढील दिवशी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला. अखेर नवीन ट्रान्स्फार्मर बसवून सायंकाळी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास नागरिक गाढ झोपेत असताना १७ सेक्शन टेकडीवरील विद्युत ट्रान्स्फार्मरच्या वाहिनीला अचानक आग लागली. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा तत्काळ खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच भाजपचे उपाध्यक्ष आणि नगरसेविका दीपा नारायण पंजाबी यांचे चिरंजीव अविनाश पंजाबी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क साधून आगीची माहिती दिली. त्यानंतर अविनाश पंजाबी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. आगीमुळे ट्रान्स्फार्मर पूर्णपणे निकामी झाल्याने तो पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नवीन ट्रान्स्फार्मर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नवीन ट्रान्स्फार्मर दुपारी बसवला. अखेर सायंकाळी सुमारे ५ वाजल्यानंतर परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, अशी माहिती अविनाश पंजाबी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.