मुंबई

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

CD

अंबिवली तलाठी कार्यालयात लाचलुचपतचा ‘सापळा’
पाच हजारांची लाच घेताना खासगी व्यक्ती जाळ्यात
टिटवाळा, ता. ११ (वार्ताहर) : कल्याण तालुक्यातील अंबिवली येथील तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला आहे. फेरफार प्रकरणातील कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना नीलेश पवार या खासगी व्यक्तीला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागातील ‘दलालां’चे धाबे दणाणले आहेत.

तक्रारदार हे ४८ वर्षीय वकील असून, त्यांना त्यांच्या अशिलाच्या जमिनीशी संबंधित जुन्या फेरफार नोंदी आणि कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती हव्या होत्या. यासाठी त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. तहसील कार्यालयाने हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी अंबिवली तलाठी कार्यालयाकडे वर्ग केला होता. तक्रारदार कागदपत्रांसाठी गेले असता, आरोपी नीलेश पवार (वय ३५) याने ‘‘नोंदी जुन्या आहेत, शोधायला वेळ लागेल’’ असे सांगून टाळाटाळ केली. अखेर काम करून देण्यासाठी त्याने सुरुवातीला पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताणणी करून सापळा रचला. मंगळवारी (ता. १०) सकाळी ११:२५ च्या सुमारास, अंबिवली तलाठी कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना नीलेश पवारला पथकाने ताब्यात घेतले.

महसूल विभागात हस्तकांचा सुळसुळाट
सरकारी कार्यालयात अधिकृत कर्मचारी नसतानाही अनेक खासगी व्यक्ती (एजंट) कामाचा निपटारा करण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार करत असल्याचे या कारवाईतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT