मुंबई

जगदंबा यात्रेत आनंद गगनाला

CD

जगदंबा यात्रेत आनंद गगनाला
विठ्ठलनगर येथे दहा हजार भाविकांची हजेरी
विक्रमगड, ता.११ (बातमीदार)ः तालुक्यातील वेहेलपाडा (विठ्ठलनगर) येथील पारंपरिक जगदंबा यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गाव-पाड्यातील दहा हजार भाविकांनी पहाटपर्यंत ४५ देव-देवतांची सोंगे नाचवत यात्रोत्सवाचा आनंद घेतला.
वेहेलपाडा (विठ्ठलनगर) येथे दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी बोहाडा साजरा केला जातो. या यात्रोत्सवात बोहाडा जगदंबा यात्रोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या बोहाडा यात्रोत्सवात रामायण, महाभारत पौराणिक ग्रंथातील देव-देवतांची निवड करून येथील घरच्या घरी लाकूड, चिकणमाती वस्तूंमधून आकर्षक हुबेहूब देवतांचे मुखवटे तयार करून पोशाख घालून परंपरेनुसार मशालींच्या उजेडात बोहाडा यात्रोत्सव सोंगे नाचवून साजरा केला जातो. त्यानंतर सरस्वती, विष्णू आणि पुराणातील देवदेवतांबरोबरच देव-देवतांच्या युद्धांचे प्रसंग सोंगे नाचवून भक्तिभावाने सादर केले जातात.
-----------------------------
एकात्मतेचा संदेश
गावातील मूळ ग्रामदेवता जगदंबा मातेस विधिवत पूजा करून महिषासुरशी झालेल्या युद्धाचे सोंगे नाचवले जातात. गावात रोगराई, संकटे येऊ नयेत म्हणून आदिवासी समाज बोहाडा म्हणजेच जगदंबा यात्रोत्सव साजरा करतात. या यात्रोत्सवात सर्वच धर्म, जातीचे लोक सहभागी होतात. बोहाडा पाहण्यासाठी वेहेलपाड्याच्या तसेच तालुक्यातील पंचक्रोशीतील भाविक १०-१० मैल दूरवरून चालत एकत्र येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT