मुंबई

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनावर धडे

CD

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : नैसर्गिक, आपत्कालिन प्रसंगी योग्य खबरदारी कशी घ्यावी आणि अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे सजग व सक्षम राहावे, याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रईस हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापनावर उपयुक्त कार्यशाळा घेण्यात आली.
शाळेतील उर्दू बसेरा सभागृहात मंगळवारी (ता. १०) हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यशाळेत ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे राहुल अहिरे आणि जयदीप जाधव यांनी संसाधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे सहाय्यक प्राचार्य मुखलिस मदू यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या कार्यशाळांचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे व्यावहारिक ज्ञान याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेदरम्यान तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना भूकंप, पूर, आग तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये कोणत्या प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, याचे सविस्तर मार्गदर्शन केले. आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता संयम आणि शिस्तीने परिस्थितीला सामोरे जाणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. संकटसमयी योग्य निर्णय घेतल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध शंका उपस्थित केल्या. तज्ज्ञांनी त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य आमिर सिद्दीकी, झाकीर अन्सारी, मुसय्यब मोमीन, शिक्षकवृंद उपस्थित होते. अब्दुल लतीफ पंगारकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक
कार्यशाळेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे प्रात्यक्षिके. तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराची मूलभूत तत्त्वे समजावून सांगितली. जखमी व्यक्तींना प्राथमिक उपचार कसे द्यावेत, त्यांना सुरक्षित ठिकाणी कसे हलवावे; तसेच अपघाताच्या वेळी तत्काळ कोणती पावले उचलावीत, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय शाळेच्या मैदानावर आग विझवण्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थ्यांना अग्निशामक यंत्राचा योग्य वापर कसा करावा, आग लागल्यास त्वरित काय उपाय करावेत याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाची व्यावहारिक माहिती मिळाली.

भिवंडी : रईस हायस्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT