मुंबई

नायगाव पुलाखाली दुर्गंधींचे ठाण

CD

नायगाव पुलाखाली दुर्गंधीचे ठाण
पालिकेच्या दिरंगाईमुळे कचऱ्याचे ढीग, स्थानिक आक्रमक
विरार, ता. ११ (बातमीदार) ः नायगाव पूर्व, पश्चिम स्थानकाला जोडणाऱ्या पुलाखाली फेरीवाल्यांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या पुलावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करत असताना, पुलाखाली साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून संपूर्ण परिसराला बकालपण आले आहे. दररोज संध्याकाळी पुलावर आणि पुलाशेजारी बसणाऱ्या फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो; मात्र वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती जी वालिव कार्यालयाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, या पुलाचा पूर्वेकडील भाग प्रभाग समिती जीमध्ये येतो; तर पश्चिमेकडील भाग प्रभाग समिती आयच्या अंतर्गत येतो; परंतु दोन्ही समित्यांच्या हद्दीच्या वादात कचरा उचलण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप साई दुर्गा मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन घरत यांनी केला आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़ः---------------------------------
आंदोलनाचा इशारा
- वसई-विरार पालिका फेरीवाल्यांकडून नियमितपणे स्वच्छता कर आकारत असेल, तर मग हा कचरा उचलण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे; पण महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून साथरोग पसरण्याची भीती आहे.
- आठवड्याभरात पुलाखालील कचरा उचलला गेला नाही तर साचलेला सर्व कचरा प्रभाग समिती जीच्या सहाय्यक आयुक्तांच्या दालनात आणून टाकण्याचा इशारा साईदुर्गा मित्र मंडळाचे चेतन घरत यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT