मुंबई

घाटकोपरमध्ये जीवघेणे खड्डे; तातडीने दुरुस्तीची प्रवाशांची मागणी

CD

घाटकोपरमध्ये जीवघेणे खड्डे; तातडीने दुरुस्तीची प्रवाशांची मागणी
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) : घाटकोपर परिसरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पश्चिमेकडील सर्वोदय सिग्नलजवळील हिराचंद देसाई मार्गासमोरील गोळीबार रोडकडे जाणाऱ्या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्त्यावर चढ-उतार आणि मधोमध पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावर योग्य प्रकारे डांबरीकरण न झाल्याने रस्ता मोठ्या प्रमाणात उखडलेला दिसून येतो. परिणामी सर्वोदय सिग्नल परिसरातून घाटकोपर स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या बेस्ट बस या मार्गावरून जाताना बसचा मागील भाग जोरात आपटत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे बसमधील प्रवाशांना धक्के बसत असून, वाहनांचेही नुकसान होत आहे.
स्थानिकांच्या मते, रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात किंवा वाहन वळवावे लागते. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात अपघाताची शक्यता अधिक वाढते. दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अधिक धोकादायक ठरत असल्याची तक्रार अभिषेक पवार यांनी केली. दरम्यान, श्रेयस सिग्नल रोडवरही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रेयस सिग्नलवरून आर सिटी मॉलकडे जाताना वाहतूक बीटजवळील रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, त्यामुळे दुचाकीस्वारांना विशेष धोका निर्माण झाला आहे. अचानक समोर येणाऱ्या खड्ड्यामुळे अनेक वाहनचालकांना वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण जात असल्याचे नागरिक सांगतात.
घाटकोपरमधील हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून, दररोज हजारो वाहनांची ये-जा येथे होते. मात्र, रस्त्यांची वेळेवर दुरुस्ती न केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया वाहनचालक हनुमंत टाव्हरे यांनी दिली. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून योग्य पद्धतीने डांबरीकरण करावे; अन्यथा एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी महापालिकेने तातडीने रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT