मुंबई

रोहा न.प.च्या वाढीव पाणीपट्टी विरोधात दुसरी शिवसेना देखील आंदोलनाच्या पवित्रात

CD

वाढीव पाणीपट्टीविरोधात ठाकरे गटाचा आंदोलनाचा पवित्रा
रोहा, ता. ११ (बातमीदार) ः रोहा अष्टमी नगर परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पाणीपट्टी करात ५५ टक्के भरमसाट वाढ करण्यात आल्याने शहरात तीव्र नाराजी पसरली आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी शिंदे गट महिला कार्यकर्त्यांनी मोर्चाचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी (ता. १०) ठाकरे गटानेही नगर परिषदेवर धडक देत या दरवाढीचा जाहीर निषेध केला.
रोहा अष्टमी नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत पाणीपट्टी करात ५५ टक्के वाढ करण्यात आली. पहिल्या अर्थसंकल्पात नागरिकांना दिलासा देण्याचा प्रघात असतो. मात्र, १,८०० रुपयांचा कर थेट २,८०० रुपयांवर नेल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही पाणीपट्टी करवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे शहरप्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत नगर परिषदेवर धडक दिला आणि वाढीव पाणीपट्टी रद्द करण्यासंदर्भात नगराध्यक्षा वनश्री शेडगे आणि मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांच्याकडे निवेदन दिले.
अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेली वाढीव पाणीपट्टी कर तातडीने रद्द करा. अन्यथा या करवाढीविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा या वेळी शहरप्रमुख राजेश काफरे यांनी दिला. या वेळी चंद्रकात कडू, प्रीतम देशमुख, ओंकार गुरव, उपेंद्र सावंत, संकेत जाधव, मंदार गायकवाड, सौरभ धाटावकर, अनिकेत भोसले, राकेश काफरे, विशाल साळवी, रोहन काफरे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन :
रोहा ः नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांना निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT