मुंबई

माहिती अधिकार महासंघ खालापूर साखळी उपोषणाचा सतरा दिवस

CD

खालापूर पंचायत समितीसमोर साखळी उपोषण सुरूच
१७व्या दिवशीही प्रशासनाने लेखी आश्वासन फेटाळले
खालापूर, ता. ११ (बातमीदार) ः पंचायत समिती प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्याने माहिती अधिकार महासंघाने साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. १२) उपोषणाचा सतरावा दिवस होता. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषद विस्तार अधिकारी नंदकिशोर भगत यांनी उपोषण मागे घेण्याबाबत लेखी पत्र दिले होते. मात्र, उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचा हा प्रस्ताव फेटाळून लावत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा, ग्रामपंचायत कार्यालयात कामाच्या वेळेचा फलक लावा, ग्रामसेवकांचे नाव आणि मोबाईल नंबर असलेला फलक लावा. हालचाल वहीत ग्रामसेवकांना नोंद करणे सक्तीचे करा, ग्रामसभेचे दृश्य चित्रीकरण आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र व गणवेश परिधान करणे बंधनकारक करा, अशा विविध मागण्यांसाठी माहिती अधिकार महासंघाने केल्या आहेत. तालुका अध्यक्ष वसंत पाटील, परशुराम मीरकुटे, एकनाथ पिंगळे, सुरेश गावडे, पद्माकर खंडागळे, गजानन साळवी, मधुकर गुरव, किशोर मोरे पंचायत समितीच्या आवारात साखळी उपोषणाला बसले आहेत, तर नंदकिशोर भगत आणि ग्रामपंचायत अधिकारी संघटना खालापूर तालुका अध्यक्ष प्रशांत कदम यांनी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

ग्रामसभेत पूर्ण वेळ दृश्य चित्रीकरण करून त्याचा डेटा उपलब्ध करून देणे आणि दप्तर अवलोकन या मागण्या मान्य केल्या आहेत, परंतु हालचाल नोंद, बायोमेट्रिक हजेरी, मुख्यालयी राहणे या महत्त्वाच्या मागण्या अपूर्ण आहेत. याशिवाय मासिक सभेला ग्रामस्थांना उपस्थित राहता येणार नाही, असा ठराव तुपगाव ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला असून, शासनाच्या परिपत्रकालादेखील केराची टोपली दाखवली आहे.
- सुरेश गावडे, सचिव माहिती अधिकार महासंघ, खालापूर

काही तांत्रिक बाबी असलेल्या मागण्या वगळून उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य आहेत. ग्रामपंचायत दप्तर अवलोकनासाठी ठराविक वार असून, मागणीप्रमाणे दप्तर उपलब्ध करून दिले जाते.
- संदीप कराड, गटविकास अधिकारी, खालापूर पंचायत समिती

**फोटो-
खालापूर ः उपोषणकर्त्यांशी चर्चा करताना विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग रायगड जिल्हा परिषद नंदकिशोर भगत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT