ठाणे भारत सहकारी बँकेला ‘आयकॉनिक लीडर’ पुरस्कार
ठाणे, ता. ११ : सहकारी बँकिंग क्षेत्रात आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा ठसा उमटवणाऱ्या ठाणे भारत सहकारी बँकेला इंटरनेट बँकिंगच्या श्रेणीत राष्ट्रीय स्तरावरील ‘आयकॉनिक लीडर’ पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले आहे. खोपोली येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित परिषदेत बँकेच्या या यशावर मोहर उमटवण्यात आली.
३० आणि ३१ जानेवारीला खोपोली येथे सहकारी सीएक्सओ १०० शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. देशातील सहकारी क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी भरवण्यात आलेल्या या परिषदेत वित्त आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञ उपस्थित होते. याच सोहळ्यात ठाणे भारत सहकारी बँकेला त्यांच्या उत्कृष्ट इंटरनेट बँकिंग सेवांसाठी हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
३१व्या शाखेचे लवकरच उद्घाटन
आपल्या ग्राहकांना नावीन्यपूर्ण आणि आधुनिक सेवा देणाऱ्या या बँकेचा विस्तार आता अधिक व्यापक होत आहे. ठाणे-कासारवडवली येथे बँक आपली ३१वी शाखा लवकरच सुरू करणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे. सध्या बँकेच्या ३० शाखा कार्यरत असून, ग्राहकांच्या विश्वासामुळे बँकेचा एकूण व्यवसाय दोन हजार २८५ कोटी रुपयांच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.