मुंबई

अवैध रेती उपसाचा रेल्वे रुळांना धोका

CD

रेल्वे प्रवाशांचा जीव टांगणीला!
अवैध रेती उपशामुळे रुळांना धोका; पोलिसांचा मनाई आदेश
ठाणे, ता. ११ ः मुंब्रा ते कल्याणदरम्यानच्या खाडीपात्रात सुरू असलेल्या बेसुमार अवैध रेती उपशामुळे रेल्वे रुळांच्या मजबुतीला आणि खाडीवरील पुलांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाच्या वारंवार ओढलेल्या ताशेऱ्यांनंतर आता ठाणे पोलिसांनी या परिसरात ‘मनाई हुकूम’ लागू केला आहे; मात्र प्रशासनाचे हे आदेश केवळ ‘कागदी घोडे’ ठरणार की प्रत्यक्ष कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंब्रा-कल्याणदरम्यान रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळून रेतीचे उत्खनन होत असल्याने लोहमार्ग खचण्याची दाट शक्यता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे. याबाबत गणेश पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून यापूर्वी गॅबियन बंधारे बांधले गेले आणि भरारी पथकेही नेमली गेली, तरीही रेतीमाफियांचा वावर सुरूच असल्याचे चित्र आहे.

६०० मीटर परिसरात कडक निर्बंध
ठाणे शहराचे पोलिस उपआयुक्त (विशेष शाखा) मीना मकवाणा यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नवीन मनाई आदेश जारी केले आहेत. रेल्वे पुलाच्या आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूला ६०० मीटर (२००० फूट) अंतरापर्यंत उत्खननास पूर्णपणे बंदी असेल. वाळू काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटी किंवा सक्शन पंपांच्या वापरावर प्रतिबंध लावला आहे. हा आदेश १० मार्च ते ८ मे २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

कायदेशीर कारवाईचा बडगा
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३च्या कलम २२३(१)(अ)(ब)नुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या आदेशाची प्रत पोलिस ठाणे, रेल्वे प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आली आहे.

कायमस्वरूपी हातोडा
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात बंदी आदेश लागू केले जातात; मात्र प्रत्यक्षात रात्रीच्या अंधारात रेती उपसा सुरूच असतो. रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या माफियांच्या बोटींवर पोलिस आणि महसूल विभाग कायमस्वरूपी हातोडा फिरवणार का, हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT