मुंबई

थकबाकीदारांना केडीएमसीचा दणका

CD

थकबाकीदारांना केडीएमसीचा दणका
५३८ मालमत्ता सील, तर २५० ठिकाणी नळजोडण्या कापल्या
डोंबिवली, ता. ११ : कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कर आणि पाणी देयकाच्या थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला असून, शहरात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या विशेष पथकाने आतापर्यंत ५३८ मालमत्ता सील केल्या असून, २५० सोसायट्या, चाळी आणि व्यापारी गाळ्यांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. ७६० कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाने आता थेट ‘लिलावा’चा इशारा दिला आहे.

आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर करवसुली पूर्ण क्षमतेने व्हावी, यासाठी पालिका आयुक्त अभिनव गोयल आणि उपायुक्त बाळासाहेब चव्हाण स्वतः मैदानात उतरले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून आयुक्त प्रत्येक प्रभागात जाऊन आढावा घेत आहेत. वसुलीत हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जात नसून, ‘आय’ प्रभागातील दोन कर्मचाऱ्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले आहे.

टिटवाळ्यातील सोसायटीवर ‘हातोडा’
टिटवाळा स्थानक परिसरातील रिजेन्सी सर्वम सोसायटीवर ‘अ’ प्रभागाने मोठी कारवाई केली. या सोसायटीतील सदनिकाधारकांकडे सुमारे आठ कोटींचा मालमत्ता कर आणि ३५ इमारतींचे ५० लाख रुपयांचे पाणीबिल थकीत आहे. थकबाकी न भरल्याने या संपूर्ण सोसायटीचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच ‘अ’ प्रभागातील नऊ अनधिकृत अनिवासी मिळकतींवर निष्कासनाची (तोडकाम) कारवाई करण्यात आली.

मालमत्तांचा होणार लिलाव?
वारंवार नोटिसा देऊनही कर न भरणाऱ्यांच्या मालमत्ता आता सील करण्यात आल्या आहेत. निर्धारित वेळेत कर भरला नाही, तर या मालमत्तांचा सार्वजनिक लिलाव करून थकबाकी वसूल केली जाईल. लिलावातून मिळालेली अतिरिक्त रक्कम मूळ मालकाला परत केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

चोरीच्या पाण्यावर फौजदारी कारवाई
नळजोडण्या तोडल्यानंतरही जर कोणी अनधिकृतपणे किंवा चोरून पाणी घेण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सुट्टीच्या दिवशीही केंद्रे सुरू
नागरिकांना कर भरता यावा, यासाठी ३१ मार्चपर्यंत सर्व १० प्रभागांतील नागरी सुविधा केंद्रे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:४५ या वेळेत सुरू राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT