मुंबई

मुरबाडमध्ये उष्णतेचा तडाखा

CD

सुधाकर वाघ : सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. ११ : मुरबाड तालुक्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा कडाका वाढला असून तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. डोंगररांगांमध्येही उष्णतेचा पारा वाढल्याने जंगल परिसरातील प्राणी-पक्ष्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.
काही दिवसांपासून मुरबाड शहरासह धसई, नारिवली, महाज, खेवारे, सोनाबळे आदी ग्रामीण भागात तापमान सातत्याने वाढत आहे. दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता इतकी वाढते की नागरिकांना बाहेर पडणे कठीण होत आहे. शेतकरी, बांधकाम कामगार, लहान मुले, तसेच ज्येष्ठ नागरिकांना या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसत आहे. उष्णतेमुळे उष्माघात व डिहायड्रेशनसारख्या आरोग्य समस्यांमध्ये वाढ होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मार्चमध्येच तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अजून एप्रिल आणि मे हे उष्णतेचे प्रमुख महिने बाकी असल्याने पुढील काळात तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वृक्षतोड प्रमुख कारण
वाढत्या उष्णतेमागे परिसरातील झाडांची मोठ्या प्रमाणावर होत असलेली तोड हे एक प्रमुख कारण असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. तालुक्यातील धसई, नारिवली, महाज, खेवारे, सोनाबळे आदी भागांत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. रस्ते विस्तार, बांधकामे आणि विविध प्रकल्पांसाठी झाडे तोडली जात असली तरी त्याऐवजी नव्याने वृक्षलागवड होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. वृक्षतोडीमुळे परिसरातील हरित पट्टा कमी होत असून त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, झाडांची संख्या कमी झाल्यास सावली आणि नैसर्गिक थंडावा घटतो व त्यामुळे परिसरातील तापमान झपाट्याने वाढते. तसेच पावसाचे चक्र बिघडण्याची शक्यताही निर्माण होते.

उष्णतेसोबत वणव्यांचे संकट
तालुक्यातील अनेक जंगल परिसरात वणवे लागण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. या वणव्यांमुळे जंगलातील वन्यजीव, प्राणी व पक्ष्यांच्या अधिवासाला मोठा धोका निर्माण होत असून पर्यावरणीय हानी वाढल्याची चिंता व्यक्त होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. याकडे वनविभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी!
भारतीय हवामानशास्त्र विभाग यांनी दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, पालघर, तसेच ठाणे जिल्हा परिसरातील काही भागांत हवामान अत्यंत उष्ण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुरबाड येथील तहसीलदार अभिजित देशमुख यांनी नागरिकांनी सतर्क राहून उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. मागील काही वर्षांत मुरबाड तालुक्यात तापमानाने विक्रमी पातळी गाठल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात तहसीलदार देशमुख यांनी, हवामान विभागाच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.


नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
* तहान लागलेली नसतानाही पुरेसे पाणी प्या.
* बाहेर जाताना हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा.
* उन्हात बाहेर पडताना टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा.
* कडक उन्हाच्या वेळी (दुपारी १२ ते ४) शक्यतो बाहेर जाणे टाळा.
* चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी किंवा जास्त घाम येणे अशी उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
* प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update : सुनेत्रा पवार यांची जोरदार घोडदौड कायम, एकविसाव्या फेरीत किती मते मिळाली?

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

Thermos Linked to Eye Injury Risk: थर्मास ठरतोय डोळ्यांसाठी धोकादायक? नव्या समस्येमुळे जगभरात ८ दशलक्षांहून अधिक प्रोडक्ट्सचा रीकॉल

'तुझा नेता हरतोय...' तरुणाने अफवांवर विश्वास ठेवला; थलपती विजयच्या चाहत्याने निकालाआधीच टोकाचा निर्णय घेतला

West Bengal Election Results : पश्चिम बंगालमध्ये ममतांचा गेम कसा पलटला? भाजपच्या ५ डावांनी बदललं संपूर्ण राजकारण!

SCROLL FOR NEXT