मुंबई

श्रीवर्धनमध्ये नियमित पाणीपुरवठ्यासाठी तातडीची पावले उचला

CD

श्रीवर्धनमध्ये नियमित पाणीपुरवठ्यासाठी तातडीची पावले उचला
रानवली धरणातून पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
श्रीवर्धन, ता. ११ (वार्ताहर) : श्रीवर्धन नगर परिषद हद्दीतील नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. रानवली धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यावर त्यांनी भर दिला.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेली पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडविणे आवश्यक आहे. रानवली धरणातून आराठी, धोंड गल्ली आणि जीवना बंदर परिसरातील साठवण टाक्यांमध्ये पाणीपुरवठ्याची व्यवस्था केल्यास नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणी मिळण्यास मदत होईल तसेच पाण्याचे समान वितरणही शक्य होईल. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळावी यासाठी स्थानिक स्तरावर पाणी वितरणाचे वेळापत्रक जाहीर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दरम्यान, श्रीवर्धनच्या पर्यटनविकासाच्या दृष्टीने समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता राखणे, पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि पर्यटनाशी संबंधित रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस जिल्हा नगरप्रशासन अधिकारी विराज लबडे, उपनगराध्यक्ष अनंत गुरव, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड तसेच नगरसेवक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT