मुंबई

बंधाऱ्यांवर नारळ लागवड

CD

बंधाऱ्यांवर नारळ लागवड; श्रीवर्धन नगर परिषदेच्या वृक्षारोपणावर प्रश्नचिन्ह
समुद्रकिनाऱ्यालगत दगडांमध्ये रोपे लावल्याने नागरिकांमध्ये चर्चा
श्रीवर्धन, ता. ११ (वार्ताहर) : श्रीवर्धन नगर परिषदेच्या वतीने समुद्रकिनाऱ्यावर वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात आली. मात्र, बंधाऱ्यांवरील दगडांमध्ये नारळाची रोपे लावण्यात आल्याने या वृक्षारोपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
समुद्रकिनाऱ्यालगत मठाचा गवंड आणि शासकीय विश्रामगृह परिसरात काही दिवसांपूर्वी नगर परिषदेकडून चिंच, पिंपळ, आवळा आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच किनाऱ्यालगत सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या बंधाऱ्यावरील दगडांच्या मधोमध लाल माती टाकून नारळाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.
नारळाच्या प्रदेशात नारळाची लागवड बंधाऱ्यांवरील दगडांमध्ये करण्यात आल्याने हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. योग्य जागा आणि मातीची गरज असताना दगडांमध्ये रोपे लावल्याने ही लागवड कितपत टिकेल, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या वृक्षारोपणाच्या नियोजनाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT