भिवंडी, ता. ११ (वार्ताहर) : भिवंडी शहर व परिसरात वीज वितरण व वीजबिल वसुली करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीतर्फे समाजात एकता आणि सामुदायिक सलोखा वाढविण्याच्या उद्देशाने मंगळवारी (ता. ११) गोपाळनगर येथील पाटीदार हॉलमध्ये भव्य दावत-ए-इफ्तार कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने, भाजप शहराध्यक्ष रवी सावंत, नगरसेवक राजेश शेट्टी, परेश चौघुले, पप्पू राका यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी टोरेंट पॉवरचे उपाध्यक्ष जीवन क्लर्क, वरिष्ठ अधिकारी जय पांड्या, सुधीर देशमुख आणि चेतन बदियानी यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सय्यद मुफ्ती मोहम्मद उझैफा कासमी यांनी उपस्थितांना रमजान महिन्याचे महत्त्व आणि इफ्तारच्या परंपरेविषयी माहिती दिली. दरम्यान, कंपनीचा लोगो बदलण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी दिली. अशा कार्यक्रमांमुळे कंपनी आणि समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.