मुंबई

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता टाळा

CD

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता टाळा
नारळपाणी, ताक, लिंबूपाणीचे सेवन करा; तज्ज्ञांचे आवाहन
मुंबई, ता. १० : उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास डिहायड्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळे दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. पुरेसे पाणी घेतल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहते, पचनक्रिया सुरळीत होते आणि थकवा कमी होतो.
उन्हाळ्यात बाहेर पडताना नियमित पाणी पिणे, नारळपाणी, ताक, लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ घेणे तसेच सैलसर व सूती कपडे वापरणे गरजेचे आहे. पिण्याचे पाणी उकळून किंवा फिल्टर करूनच वापरावे, असेही डॉक्टरांनी सांगितले.
शरीरातील पाण्याची कमतरता झाल्यास थकवा, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवू शकतो. त्यामुळे नियमित पाणी पिणे आणि हंगामी फळे-भाज्या आहारात समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे, असे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.
दरम्यान, रमजानमध्ये दीर्घकाळ उपवासामुळे शरीरात पाण्याची कमतरता होण्याची शक्यता असते. त्यामुळे इफ्तारपासून पहाटेपर्यंत थोड्या-थोड्या अंतराने पाणी पिणे, पाण्याने समृद्ध अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणे आणि मिठाचे प्रमाण कमी ठेवणे आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
डिहायड्रेशनमुळे किडनी स्टोन, युटीआय आणि लघवीसंबंधी तक्रारी वाढू शकतात. योग्य प्रमाणात पाणी आणि द्रवपदार्थ घेतल्यास हा धोका कमी होऊ शकतो, असे युरोलॉजिस्ट डॉ. मंगेश पाटील (सैफी हॉस्पिटल) यांनी सांगितले.

असे करा उपाय :
- दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी प्या.
- नारळपाणी, ताक, लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ घ्या.
- काकडी, टरबूज यांसारखी पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खा.
- सैलसर व सूती कपडे वापरा.
- दीर्घकाळ उन्हात राहणे टाळा.
- पिण्याचे पाणी उकळून किंवा फिल्टर करूनच वापरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

Nagpur Crime : खापरखेड्यात मनोरुग्णाचा पोलिसांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; दोघे शिपाई जखमी

SCROLL FOR NEXT