मुंबई

नवी मुंबई महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर

CD

वाशी, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेचे आर्थिक वर्ष २०२५-२६ चे सुधारित आणि २०२६-२७ चे मूळ अंदाजपत्रक प्रशासनाकडून स्थायी समितीकडे सादर करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी मंगळवारी (ता. ११) बंद लिफाफ्यात हे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांच्याकडे सादर केले. महापालिकेच्या उत्पन्न व खर्चाचा आढावा घेणारे, हे महत्त्वाचे अंदाजपत्रक असल्याने आगामी काळात स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.

समिती सदस्यांकडून विविध मुद्द्यांवर मते मांडली जाणार असून, आवश्यक ते बदल व सुधारणा सुचविण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून अंदाजपत्रकात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. सुधारित अंदाजपत्रकावर चर्चा पूर्ण झाल्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानंतर हे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी महापालिकेच्या महासभेसमोर ठेवण्यात येणार आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतरच ते अधिकृतपणे अमलात येईल.

स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी याबाबत सांगितले की, महापालिकेची विकासकामे, नागरिकांसाठीच्या सुविधा, तसेच विविध प्रकल्पांचा विचार करून अंदाजपत्रकावर चर्चा केली जाणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, यासाठी सदस्यांकडून सकारात्मक सूचना करण्यात येतील. नवी मुंबईकर नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्यसेवा, शिक्षण, परिवहन व्यवस्था तसेच विविध नागरी सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या अंदाजपत्रकाला विशेष महत्त्व असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

Latest Marathi News Live Update : सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाहीच; 2 मे'पर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Hadapsar Fire : सिलेंडरमधून गॅस गळती होवून लागलेल्या आगीत दुकाने जळून खाक, दोनजण जखमी

PBKS vs RR Live: २,४,६,४,४,१, ४! प्रियांश आर्यने ७ चेंडूंत राजस्थानला झोडले; जोफ्रा आर्चर कर्णधार रियानवर संतापला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT