रोहा खो-खो प्रीमियर लीगमध्ये अवचितगड मेढा संघ विजेता
मेढा मैदानावर रंगलेल्या स्पर्धेत तालुक्यातील संघांचा उत्साहपूर्ण सहभाग
रोहा, ता. ११ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील क्रीडाप्रेमींसाठी आयोजित करण्यात आलेली रोहा खो-खो प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा मेढा येथील मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत तालुक्यातील नामांकित संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट सामने खेळले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अवचितगड मेढा (रोहा) फायटर्स संघाने दमदार खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. एस.एन.एस. स्पोर्ट्स रोहा चॅलेंजर्स संघ द्वितीय, श्री भैरवनाथ यशवंतखार रोहा वॉरियर्स तृतीय तर ओम साई राम रोहा लिजेंड्स संघ चतुर्थ क्रमांकावर राहिला.
स्पर्धेत उत्कृष्ट रक्षणासाठी प्रतीक जंगम, उत्कृष्ट आक्रमक म्हणून राज देशमुख, उदयोन्मुख खेळाडू म्हणून रुद्र मांडलेकर, उत्कृष्ट कर्णधार म्हणून ओंकार मालुसकर आणि सामनावीर म्हणून अक्षय मोरे यांचा सन्मान करण्यात आला. महिला गटात सह्याद्री शक्ती संघ प्रथम, तर कोकण पॉवर संघ द्वितीय ठरला.
स्पर्धेचे आयोजन जय बजरंग क्रीडा मंडळ, रोहा यांच्या वतीने करण्यात आले होते.
फोटो कॅप्शन : रोहा खो-खो प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम विजेता अवचितगड मेढा संघाचा सत्कार करताना मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.