मुंबई

लोक अदालतीत ६५२७ प्री-लिटिगेशन प्रकरणे

CD

थकीत कर भरण्यासाठी ‘सुवर्णयोग’
कल्याण लोकअदालतीत ६,५२७ प्रकरणांचा फैसला

डोंबिवली, ता. ११ ः वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले कायदेशीर वाद आणि मालमत्ता कराची थकबाकी तातडीने निकाली काढण्यासाठी शनिवारी (ता. १४) कल्याण येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीत एकूण सहा हजार ५२७ ‘दावा दाखलपूर्व’ (प्री-लिटिगेशन) प्रकरणे सुनावणीसाठी ठेवली असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिकेने केले आहे.

यंदाच्या लोकअदालतीसाठी ६,५२७ प्रकरणांच्या नोटिसा न्यायालयाच्या सही-शिक्क्यासह तयार करण्यात आल्या आहेत. या नोटिसा संबंधित प्रभाग कार्यालयांमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या नागरिकांना नोटिसा प्राप्त झाल्या आहेत, त्यांनी शनिवारी (ता. १४) न्यायालयात उपस्थित राहून तडजोडीने आपले प्रकरण निकाली काढावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

न्यायालय परिसरात जय्यत तयारी
लोकअदालतीला होणारी गर्दी लक्षात घेऊन केडीएमसीने न्यायालय परिसरात चोख व्यवस्था केली आहे; प्रभागनिहाय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र टेबल, खुर्च्या, संगणकीय यंत्रणा आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका आणि कडक पोलिस बंदोबस्त तैनात असेल. तसेच उन्हाचा कडाका लक्षात घेता नागरिकांना सावलीसाठी मंडप आणि पंख्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.

करदात्यांना मोठी संधी
मालमत्ता कराच्या थकबाकीमुळे ज्यांचे व्यवहार कायदेशीर प्रक्रियेत अडकले आहेत, अशा करदात्यांसाठी ही मोठी संधी आहे. प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून महापालिकेस सहकार्य करावे आणि शहराच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 Declared : बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी, पुणे-मुंबई की कोकण? कोणता विभाग अव्वल? जाणून घ्या...

LPG Chhotu Cylinder: छोटू गॅस सिलेंडरचे भाव भडकले! घरगुती LPG पेक्षाही तिप्पट महाग; 5 किलो गॅस आता कितीला?

Bhor Minor Assault Case : पुणे चिमुकली अत्याचारात धक्कादायक बाब उघड, फॉरेन्सिक पथक दाखल; गोठ्यात नेऊन बलात्कार, आरोपी जेलची हवा भोगलेला

Mumbai T20 League: मुंबई टी-२० लीगसाठी आज लिलाव; पुरुष अन् महिला विभागात २,४११ खेळाडूंचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रस्तावित ५२९ झाडांच्या तोडीविरोधात नागरिक रस्त्यावर

SCROLL FOR NEXT