पडघा (बातमीदार) : पडघा येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वैश्य समाज महिला मंडळाच्या वतीने झेंडा नाका, वाणी आळी येथे मंगळवारी सायंकाळी कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षला चौधरी-थवीळ होत्या. यावेळी नगरसेविका रोमा आळशी, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पलता पाटील, सरपंच सायली पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती श्रेया गायकर, आशा मोरे, वृषाली विशे, तसेच आरोग्य अधिकारी डॉ. साक्षी बुलबुले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फीत कापून झाली. या वेळी वैश्य समाजातील ज्येष्ठ महिला वत्सला बिडवी, स्वाती बिडवी व संगीता रोडगे यांचा सत्कार करण्यात आला. प्राची तेलवणे व सहकाऱ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित लघुनाट्य सादर केले. तसेच महिलांसाठी लकी ड्रॉ, हळदी-कुंकू, ‘खेळ पैठणीचा’ यांसारखे उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.