मुंबई

नंदलाल बोस यांच्या कलाकृतींना उजाळा

CD

नंदलाल बोस यांच्या कलाकृतींना उजाळा

मुंबई, ता. ११ : मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) येथे ‘कलर्स ऑफ स्वदेश : फ्रॉम हरिपुरा टू द कॉन्स्टिट्यूशन’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय आधुनिक कलेतील महत्त्वाचे कलाकार नंदलाल बोस (१८८२-१९६६) यांच्या कलाकृतींवर आधारित हे प्रदर्शन ९ एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
भारतीय कला आणि सांस्कृतिक परंपरेतून प्रेरणा घेत स्वतंत्र दृष्यभाषा निर्माण करणाऱ्या बोस यांच्या कार्याचा आढावा या प्रदर्शनातून घेता येणार आहे. या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण म्हणजे १९३८ मध्ये हरिपुरा येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनासाठी तयार केलेले प्रसिद्ध ‘हरिपुरा पॅनेल्स’. महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रांमधून ग्रामीण भारतातील दैनंदिन जीवन प्रभावी रंगरेषांमधून साकारले आहे. यासोबतच भारतीय संविधानाच्या मूळ हस्तलिखितासाठी नंदलाल बोस यांनी केलेल्या सजावटीच्या रचना आणि चित्रांची झलकही येथे पाहायला मिळते. विशेष म्हणजे, एनजीएमए मुंबईत नंदलाल बोस यांच्यावर आधारित स्वतंत्र प्रदर्शन प्रथमच सादर केले जात आहे.
पारंपरिक कलाकृतींसोबत आधुनिक डिजिटल सादरीकरणाचाही समावेश करण्यात आला असून, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने काही दृश्यांचे अनुभवात्मक सादरीकरण करण्यात आले आहे. हे प्रदर्शन फोर्ट येथील एनजीएमए येथे दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत पाहता येणार असून, प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update : सुनेत्रा पवार यांची जोरदार घोडदौड कायम, एकविसाव्या फेरीत किती मते मिळाली?

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

Thermos Linked to Eye Injury Risk: थर्मास ठरतोय डोळ्यांसाठी धोकादायक? नव्या समस्येमुळे जगभरात ८ दशलक्षांहून अधिक प्रोडक्ट्सचा रीकॉल

'तुझा नेता हरतोय...' तरुणाने अफवांवर विश्वास ठेवला; थलपती विजयच्या चाहत्याने निकालाआधीच टोकाचा निर्णय घेतला

West Bengal Election Results : पश्चिम बंगालमध्ये ममतांचा गेम कसा पलटला? भाजपच्या ५ डावांनी बदललं संपूर्ण राजकारण!

SCROLL FOR NEXT