मुंबई

दिव्यांगांसाठी अडथळामुक्त शहराच्या दिशेने पनवेल महापालिकेची पावले

CD

दिव्यांगांसाठी अडथळामुक्त शहराच्या दिशेने पनवेल महापालिकेची पावले
मुख्यालयात दिव्यांग सुविधांबाबत आढावा बैठक; सार्वजनिक ठिकाणी सुलभतेवर भर
वाहतूक, तंत्रज्ञान व सेवा केंद्रांमध्ये सुधारणा करण्याबाबत विभागांना सूचना

पनवेल, ता. ११ (बातमीदार) : शहरातील दिव्यांगबांधवांना सार्वजनिक ठिकाणी अधिक सुलभ आणि अडथळामुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल महापालिका मुख्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा, त्यांच्या समस्या तसेच आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीत शहरातील सार्वजनिक ठिकाणे, महापालिकेची कार्यालये आणि विविध सेवा केंद्रे दिव्यांगांसाठी अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात आला. दिव्यांग व्यक्तींना अडथळामुक्त प्रवेश मिळावा, तसेच त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बैठकीत दिव्यांगबांधवांसाठी वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा अधिक सुलभ कशा करता येतील यावरही चर्चा झाली. दिव्यांग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेऊन त्या अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या.
या बैठकीस उपायुक्त रवीकिरण घोडके, शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, विभागप्रमुख हरेश जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दिव्यांगांसाठी सुलभ पायाभूत सुविधा उभारण्यावर भर
बैठकीत शहरातील सार्वजनिक ठिकाणे दिव्यांगांसाठी अधिक सुलभ करण्यासाठी रॅम्प, विशेष मार्गदर्शक पट्ट्या, लिफ्ट सुविधा, तसेच दिव्यांगांसाठी अनुकूल स्वच्छतागृहे उभारण्यावर विशेष भर देण्यात आला. महापालिकेच्या सर्व सेवा केंद्रांमध्ये दिव्यांगांना सहज प्रवेश मिळावा आणि त्यांना आवश्यक कागदपत्रे व सेवा मिळविताना अडचणी येऊ नयेत यासाठी संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. शहर अधिक समावेशक व दिव्यांगांसाठी अनुकूल बनविण्यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT