मुंबई

स्त्री सन्मानाचा लढा अद्याप अपूर्ण

CD

स्त्री सन्मानाचा लढा अद्याप अपूर्ण
संविधान अभ्यासक दीक्षा गायकवाड यांचे मत
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : पूर्वी स्त्रियांना अबला मानले जायचे आणि त्यांचे शिक्षण पाप समजले जायचे. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी या व्यवस्थेविरोधात लढा देऊन स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. मात्र, आजही समाजाने स्त्रियांना पूर्णपणे ‘माणूस’ म्हणून स्वीकारलेले नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध संविधान अभ्यासक दीक्षा गायकवाड यांनी केले.

कल्याण-डोंबिवली महापालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई यांची संयुक्त जयंती आचार्य अत्रे रंगमंदिराच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये साजरी करण्यात आली. या वेळी संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महापौर व विद्यमान नगरसेवक रमेश जाधव यांनी केले. व्यासपीठावर नगरसेविका माया कांबळे, संस्थाध्यक्ष चंद्रकांत पोळ, जयंती समिती अध्यक्ष संतोष हेरोडे, संजीवनी पाटकर, ज्येष्ठ कवी प्रा. शुक्राचार्य गायकवाड, एस. आर. भोसले, सिद्धार्थ मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मतदान जनजागृतीसाठी विशेष मोहीम
संस्थाध्यक्ष चंद्रकांत पोळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एक महत्त्वाची घोषणा केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘मतदानाचा अधिकार आणि महत्त्व’ पटवून देण्यासाठी संस्था विशेष मोहीम राबवणार आहे. या अभियानाच्या ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून दीक्षा गायकवाड काम पाहणार आहेत.

विविध उपक्रमांची जोड
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रंगतदार कविसंमेलन झाले. सामाजिक विचारांसोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत या वेळी मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते, ज्याचा अनेकांनी लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नवनीत गायकवाड, सुनील चाटे, बाबासाहेब काकडे, बाळू शिंदे, युवराज गाडे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान मोरे यांनी केले, तर विलास कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT