मुरुड पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा
निलेश घाटवळ सभापती, तर अश्विनी जंगम उपसभापती पदी बिनविरोध
तांत्रिक कारणास्तव भाजप उमेदवाराचा अर्ज बाद
मुरुड, ता. ११ (बातमीदार) ः मुरुड पंचायत समितीच्या चुरशीच्या निवडणुकीनंतर बुधवारी (ता. ११) शिंदे गट निलेश घाटवळ यांची सभापती पदी, तर अश्विनी जंगम यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आदेश डफळ यांनी ही अधिकृत घोषणा केली.
तब्बल चार वर्षानंतर झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत एकूण ४ जागांपैकी बोर्ली गणातून निलेश घाटवळ, नांदगाव गणातून गणेश नाक्ती व राजपुरी गणातून शिंदे गटाचे एकूण तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर कोर्लई गणातून भाजपाच्या अश्विनी डोंगरीकर विजयी झाल्या होत्या. शिवसेनेकडून सभापती पदासाठी निलेश घाटवळ व भाजपाच्या अश्विनी डोंगरीकर यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते. तर, शिंदे गटाच्या अश्विनी जंगम यांनीदेखील उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननी अंती अश्विनी डोंगरीकर यांचा अर्ज बाद करण्यात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय तवर, गटविकास अधिकारी राजेंद्र कुमार खताळ व महेश पाटील यांनी काम पाहिले.
निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषवाजी करत गुलाल उधळत जल्लोषात विजय साजरा केला.
२०१७ च्या पंचायत समिती निवडणुकीत निलेश घाटवळ यांच्या पत्नी नीता घाटवळ या सभापतीपदी निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली .
सोबत फोटो
मुरुड ः गट विकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांनी विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.