मुंबई

ठोक मानधन व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा नियमावलीत स्थान द्या

CD

ठोक मानधन व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा नियमावलीत स्थान द्या
नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत सरोज पाटील यांची मागणी
तुर्भे, ता. ११ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत शिवसेना नगरसेविका सरोज पाटील यांनी ठोक मानधन व कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले. महापालिकेच्या सेवा विनियम नियमावली २०२६ मध्ये या कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये अनेक कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून ठोक मानधन व कंत्राटी पद्धतीवर काम करत असूनही त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा व सेवा सुरक्षा मिळत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. शहराच्या विकासासाठी व महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात या कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याने त्यांच्या सेवेला न्याय मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सेवा विनियम नियमावली २०२६ मध्ये त्यांचा समावेश करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होऊन सदस्यांचेही लक्ष वेधले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यवतमाळ जिल्हा बँक बरखास्तीनंतर राजकारण तापले! ‘सत्तेतच डाव-प्रतिडाव’; निवडणुकीआधीच आरोपांची सरबती

PBKS vs RR Live: प्रीति झिंटाच्या काळजाचा ठोका चुकलाच होता, पण...! श्रेयस अय्यरसोबत असं काही घडलं की, ती घाबरली; नेमकं काय?

Nitin Gadkari Hydrogen Fuel Statement : पेट्रोल-डिझेल गाड्या होणार बंद? नितीन गडकरींचं मोठं विधान; आता पेट्रोलऐवजी 'या' इंधनावर धावणार गाड्या!

आई मुस्लिम, वडील गुजराती... एकमेकांवर प्रेम असूनही आरती सोलंकीचे आई-वडील झालेले वेगळे, हे होतं कारण

Latest Marathi News Live Update : विदर्भातील सर्व जिल्ह्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT