उरणमध्ये १० ग्रॅम हेरॉईनसह एकाला अटक
उरण, ता. ११ (बातमीदार) : उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली आहे. धुतूम गाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी १०.१९ ग्रॅम हेरॉईनसह ३५ वर्षीय संशयिताला रंगेहाथ पकडले. या कारवाईत सुमारे चार लाख सात हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना धुतूम परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक हनिफ मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने जय भवानी पेट्रोलपंप आणि आई एकविरा ढाबा परिसरातील सर्व्हिस रोडवर सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या जाहेदुर जलील शेख (वय ३५) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्याच्याकडून फिकट तपकिरी रंगाच्या हेरॉईनच्या २५० पुड्या आढळल्या. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.