मुंबई

तहानलेल्या वाड्यावस्त्यांची होरपळ

CD

भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ११ : वाढत्या उन्हाच्या झळा आणि आटत चाललेले जलस्रोत यामुळे शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. दररोज नव्या गावांमध्ये आणि वाड्यावस्त्यांमध्ये पाण्याची समस्या गंभीर बनत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी धडपड वाढल्याने त्रस्त झालेल्या अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील उठावा गावातील आदिवासी महिलांनी अखेर संताप व्यक्त करत पंचायत समितीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर घेराव घातला. सुमारे ३५ किलोमीट अंतरावरून आलेल्या या आदिवासी महिलांनी तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.

शहापूर शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अजनुप ग्रामपंचायत हद्दीत दोन महसुली गावे आणि तब्बल १७ आदिवासीबहुल वाड्यावस्त्या आहेत. एकूण १९ गावे आणि वाड्यावस्त्यांची एकूण लोकसंख्या चार हजार २८५ इतकी आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू होताच येथे पाणीटंचाई निर्माण होते. यंदा जानेवारीअखेरीसच परिसरातील नैसर्गिक जलस्रोत आटू लागल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. विहिरी, ओढे आणि छोटे जलसाठे कोरडे पडल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. महिलांवर या संकटाचा सर्वाधिक परिणाम होत आहे. त्यांना दररोज डोंगरवाटा ओलांडत दूरवर जावे लागत आहे. या परिस्थितीने त्रस्त झालेल्या उठावा गावातील महिलांनी अखेर एकत्र येत थेट शहापूर पंचायत समितीत धडक देण्याचा निर्णय घेतला. जवळपास ३५ किलोमीटरचा प्रवास करून त्या सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या आणि अधिकाऱ्यांना घेराव घालत आपल्या व्यथा मांडल्या.
आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी रोज अनेक किलोमीटर चालावे लागते. लहान मुले, घरकाम आणि शेतीची कामे सांभाळताना पाण्यासाठी होणारी ही धावपळ असह्य झाली आहे, असे सांगत महिलांनी प्रशासनाने तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली. सध्या तालुक्यातील सहा महसुली गावे आणि २२ वाड्यावस्त्यांना १० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

ठिय्या आंदोलनाचा इशारा
पाणीटंचाईमुळे होरपळ सुरू असताना जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप या महिलांनी केला. मागील वर्षी टंचाई निवारण कृतीआराखड्यातील उपाययोजना राबविल्या नसल्याचे या महिलांनी सांगितले. येथे पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनाच अस्तित्वात नसल्याने तीव्र पाणीटंचाई सोसावी लागत आहे. दरम्यान, तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू न केल्यास कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिला.
-----

पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील उठावा आदिवासी वस्तीतील महिलांच्या मागणीनंतर तेथे तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. या वस्तीच्या पाणीपुरवठ्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी महसूल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
- विजया पांढरे, उपअभियंता, सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग, शहापूर

शहापूर : तालुक्यातील उठावा येथील महिलांनी पाण्यासाठी ३५ किमीचा प्रवास करत पाणीपुरवठा कार्यालयाला घेराव घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT