मुंबई

दातिवऱ्यात हेलिकॉप्टरचे अचानक लँडिंग

CD

दातिवऱ्यात हेलिकॉप्टरचे अचानक लँडिंग
पालघर, ता. ११ : पालघर तालुक्यातील दातिवरे समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी एका हेलिकॉप्टरने अचानक लँडिंग केल्याने परिसरात काही काळ चर्चांना उधाण आले होते; मात्र ही घटना तटरक्षक दलाच्या नियमित गस्तीचा भाग असल्याचे पोलिसांच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे.

मुंबई तटरक्षक दलाचे चेतक हेलिकॉप्टर मंगळवारी समुद्री गस्तीवर होते. गस्तीदरम्यान दातिवरे किनाऱ्याजवळील खाडी परिसरात दोन व्यक्ती दिसून आल्या. सुरक्षेच्या दृष्टीने संशय निर्माण झाल्याने हेलिकॉप्टरमधील जवानांनी खाली उतरून परिस्थितीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, हेलिकॉप्टर खाडी परिसरात उतरवण्यात आले. चौकशी केली असता, त्या दोन्ही व्यक्ती मच्छीमार असून, ते मासेमारीसाठी समुद्रात उतरल्याचे समोर आले. त्यानंतर हेलिकॉप्टरने पुन्हा मुंबईकडे उड्डाण केले, अशी माहिती केळवे सागरी पोलिसांनी दिली.

यापूर्वीही केळवे रोड परिसरात हेलिकॉप्टर उतरल्याच्या घटना घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी शाळेच्या मैदानावर हेलिकॉप्टर उतरून सामाजिक दायित्व निधीतून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. तसेच १० फेब्रुवारी रोजी वैमानिक प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक सिग्नल मिळाल्याने हेलिकॉप्टर काही काळ केळवे रोड येथे उतरवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT