मुंबई

ठाण्यात गॅसचा ''भडका''

CD

ठाण्यात गॅसचा ‘भडका’
१,८०० रुपयांचा सिलिंडर पाच हजारांना! हॉटेल व्यावसायिक आक्रमक
ठाणे, ता. ११ : अखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या ढगांनी ठाण्यातील हॉटेल व्यवसायाला ग्रासले आहे. जागतिक स्तरावर गॅसपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असतानाच, ठाण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा काळाबाजार सुरू झाला असल्याचा गंभीर आरोप ‘ठाणे हॉटेल असोसिएशन’ने केला आहे. सुमारे १,८०० रुपयांना मिळणारा सिलिंडर चक्क चार ते पाच हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पुरेसा गॅससाठा असल्याचे स्पष्ट केले असतानाही, काही घटक बाजारात मुद्दाम ‘कृत्रिम टंचाई’ निर्माण करत आहेत. या प्रकारामुळे हॉटेलचालकांचे कंबरडे मोडले असून, व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. यासंदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली.

७० टक्के हॉटेल्सना टाळे लागण्याची भीती
ठाणे शहरात सुमारे १,२०० मोठी हॉटेल्स असून, इतर लहान-मोठे खाद्य व्यवसाय धरले तर ही संख्या पाच हजारांच्या पार जाते. शहरातील केवळ ३० टक्के हॉटेलमध्ये पाइपलाइन गॅस आहे, तर उर्वरित ७० टक्के व्यावसायिक आजही सिलिंडरवर अवलंबून आहेत. गॅसचा पुरवठा विस्कळित झाल्यास ही हॉटेल्स बंद पडू शकतात. याचा थेट फटका रोज हॉटेलवर अवलंबून असणारे आयटी कर्मचारी, कामगार आणि पर्यटकांना बसेल. अगदी वडापाव विकणाऱ्या छोट्या व्यवसायांनाही यामुळे मोठा फटका बसणार आहे.

छापे टाकण्याची मागणी
‘‘परिस्थिती अशीच राहिली, तर शहर उपाशी राहण्याची वेळ येईल,’’ अशी भीती व्यक्त करत असोसिएशनने राज्य सरकारकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. गॅसचा काळाबाजार करणाऱ्या गोडाऊन आणि फिलिंग सेंटरवर तातडीने छापे टाकावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. याप्रकरणी लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT