मुंबई

नेरूळमधील बामणदेव मैदानावर रेसिंग ट्रॅकला विरोध

CD

नेरूळमधील बामणदेव मैदानावर रेसिंग ट्रॅकला विरोध
स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना आक्रमक; पर्यायी जागेची महापौरांकडे मागणी
वाशी, ता. ११ (बातमीदार) : इंडियन रेसिंग फेस्टिव्हल अंतर्गत होणाऱ्या फॉर्म्युला-४ कार रेसिंगसाठी नेरूळ सेक्टर २६ येथील बामणदेव मैदानावर रेसिंग ट्रॅक उभारण्याच्या प्रस्तावाला स्थानिक ग्रामस्थांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. मैदानावर ट्रॅक उभारल्यास खेळाचे मैदान नष्ट होईल तसेच झाडांची कत्तल होण्याची शक्यता असल्याचे सांगत पर्यायी जागेचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात महापौर सुजाता पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक व क्रीडा समिती सदस्य अनिकेत म्हात्रे, नगरसेविका ऐश्वर्या सोनावणे, गटनेते मनोज हळदणकर, नगरसेवक जगदीश गवते तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशासनाच्या नियोजनानुसार या मैदानावर रेसिंग ट्रॅक उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी सुमारे ४५ ते ५० झाडे तोडली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे खेळाडूंच्या हक्काचे मैदान वाचवण्यासाठी शिवसेना व स्थानिक ग्रामस्थ आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
कोट
नवी मुंबईत होणाऱ्या फॉर्म्युला ४ रेसिंग कार स्पर्धेला आमचा विरोध नाही. मात्र, रेसिंग ट्रॅक बामणदेव खेळाच्या मैदाना ऐवजी पर्यायी मार्गांचा प्रशासनाने विचार करून त्या ठिकाणी ट्रॅक उभारावा. शहरातील स्थानिक भूमिपुत्र खेळाडूंसाठी असणारी खेळाच्या मैदानाचा खेळासाठीच वापर झाला पाहिजे.
अनिकेत म्हात्रे, शिवसेना युवा जिल्हाप्रमुख नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT