खालापूरच्या इतिहासात प्रथमच भाजपाचा सभापती
कृष्णा पारंगे सभापतीपदी तर भाई शिंदे उपसभापती पदावर निवड
खालापूर, ता. ११ (बातमीदार) ः खालापूर पंचायत समिती सभापती पदावर इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा उमेदवार विराजमान झाला आहे. तर, शिंदे गटाला उपसभापती पद मिळाले आहे. कृष्णा पारंगे सभापती तर भाई शिंदे यांची उपसभापती म्हणून निवड जाहीर करण्यात आली.
खालापूर तालुक्यात शिंदे आणि भाजप युतीत एकत्र लढले होते. भाजपाला सर्वाधिक आठपैकी तीन जागा मिळाल्या होत्या. तर शिंदे गटाला दोन जागा मिळाल्याने बहुमत युतीकडे होते. त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, महाविकास आघाडीकडून अजित पवार गटाच्या देवयानी देशमुख यांनी सभापती पदासाठी तर प्रमिला पाटील यांनी उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक घेण्यात आली. कृष्णा पारंगे यांना आठपैकी पाच तर देवयानी देशमुख यांना तीन मत मिळाल्याने कृष्णा पारंगे यांची सभापती पदावर निवड जाहीर करण्यात आली. उपसभापती पदासाठी भाई शिंदे यांना पाच तर प्रमिला पाटील तीन मत मिळाल्याचे निवडणूक अधिकारी यांनी सांगितले. निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, भाजपाचे नेते नरेश पाटील, सनी यादव, सुधीर ठोंबरे, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश पाटील, ज्ञानेश्वर गायकवाडसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार अभय चव्हाण यांनी काम पाहिले.
**फोटो-
नवनिर्वाचित सभापतीचे अभिनंदन करताना आमदार महेंद्र थोरवे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.