बेकरी गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला अटक
भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : काशीमिरा येथील इंटरनॅशनल बेकरीतील गोळीबार प्रकरणातील फरार मुख्य आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख ऊर्फ पप्पू पेजर याला गुन्हे शाखेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.
ऑक्टोबर २०२३ मध्ये सकाळी सुमारे १० वाजता एका अनोळखी व्यक्तीने बेकरीत घुसून मालक चंद्रकांत मल्लप्पा कोंडगुले यांच्यावर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र गोळी न सुटल्याने तो तेथून पसार झाला. तपासात हा गुन्हा संघटित टोळीने कट रचून केल्याचे समोर आल्याने मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी तीन आरोपींना अटक झाली होती, तर मुख्य आरोपी परदेशात पळून गेला होता. तो मुंबई विमानतळावर उतरल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.