मुंबई

महिलांनी अनुभवला ठाण्याचा वारसा

CD

महिलांनी अनुभवला ठाण्याचा वारसा
महिला दिनानिमित्त विशेष हेरिटेज वॉक
ठाणे, ता .११ (बातमीदार): जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. ८) ग गप्पांचा, भ भ्रमंतीचा आणि इशा टूर्स यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त महिलांसाठी विशेष ठाणे हेरिटेज वॉक आयोजित केला होता. ठाणे शहराचा समृद्ध इतिहास जाणून घेण्याची संधी या उपक्रमातून महिलांना मिळाली. या हेरिटेज वॉकमध्ये सुमारे ४० महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
या उपक्रमात २५ ते ८९ वयोगटातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी सहभाग घेतला. इतिहासाविषयी कुतूहल आणि शहराच्या वारशाबद्दल अभिमान व्यक्त करत महिलांनी हा अनुभव संस्मरणीय असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजक जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय नेटके नियोजन करून महिला दिन वेगळ्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या अनोख्या उपक्रमाबद्दल सहभागी महिलांनी समाधान व्यक्त केले.

असा होता वॉकचा मार्ग
मराठी ग्रंथ संग्रहालय ते सेंट जेम्स चर्च असा या वॉकचा मार्ग होता. या दरम्यान महिलांनी शहरातील अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देत त्यांच्या इतिहासाची माहिती जाणून घेतली. पेशवाई काळातील विठ्ठल मंदिर, बिंब राजवटीतील कौपीनेश्वर मंदिर, पारशी अग्यारी, ठाण्यात सुमारे २०० वर्षांपूर्वी सुरू झालेली सरकारी इंग्रजी शाळा, टाऊन हॉल, कोतवाल बाबाजी नाइक यांचा वाडा, सेंट जेम्स चर्च आणि ठाण्याचे पहिले जिल्हा न्यायाधीश स्टीफन बॅबिंग्टन यांच्या स्मारकाला भेट देत महिलांनी ठाण्याच्या वारशाचा जवळून अनुभव घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT