मुंबई

वांद्रे पश्चिमेतील रेस्टॉरंटकडून ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर ?

CD

वांद्रे येथील रेस्टॉरंटकडून ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर?
चौकशी करून योग्य कारवाईचे उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : वांद्रे येथील एका नामांकित रेस्टॉरंटकडून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींची उच्च न्यायालयाने नुकतीच दखल घेतली आहे. तसेच, या तक्रारीच्या चौकशीचे आणि त्यात तथ्य आढळल्यास रेस्टॉरंटवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिका आणि पोलिसांना दिले आहेत. 
न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. श्रीराम  मोडक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. तेव्हा याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने पोलिस आयुक्तांना या प्रकरणाच्या चौकशीचे आणि रेस्टॉरंटकडून ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यासाठी खंडपीठाने याचिकाकर्त्यांना आठवड्याभरात सहाय्यक महापालिका आयुक्तांकडे सविस्तर निवेदन देण्याचे आणि महापालिकेला या प्रकरणाची त्वरित चौकशी करून योग्य कारवाईचेही आदेश दिले.
वांद्रे पश्चिमेकडील २९व्या आणि १६व्या मार्गाच्या जंक्शनवर असलेल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटविरोधात वैद्यकीय व्यवसाय करणारे ६९ वर्षांचे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सुशील ताहिलियानी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेनुसार, रेस्टॉरंटच्या आवारात आणि बाहेर नियमितपणे रात्री १० वाजल्यानंतर परवानगीपेक्षा मोठ्या आवाजात संगीत सुरू असते. परिसराच्या बाहेरील भागावर टिन शीट बसवल्याने आवाजाची पातळी आणखी वाढले. परिणामी, आजूबाजूच्या किमान दहा इमारतींमधील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा याचिकेत केला आहे. रेस्टॉरंटमधील आवाज, गोंगाटाची पातळी परवानगी असलेल्या डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त असते आणि बहुतेकदा रात्री उशिरापर्यंत ती कायम असते. त्यामुळे, दैनंदिन कामकाज आणि परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होतो, असेही म्हटले आहे. नोव्हेंबर २०२४ ते मे २०२५ दरम्यान पोलिस सहाय्यक महानिरीक्षक, पोलिस उपायुक्त आणि महापालिकेकडे अनेक तक्रारी करूनही काहीच उपयोग झाला नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT