उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : महापालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी कर आकारणीच्या नोंदी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मालमत्तेचे क्षेत्रफळ, बांधकाम प्रकार, वापर किंवा पुनर्बांधणीसंबंधी काही बदल झाल्यास नागरिकांना हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे घरमालक, भोगवटाधारक आणि प्रतिनिधींनी वेळेत नोंदी तपासून आवश्यक असल्यास लेखी हरकत सादर करण्याचे आवाहन आयुक्त ममीषा आव्हाळे यांनी केले आहे.
ज्या मालमत्तांच्या क्षेत्रफळात, बांधकाम प्रकारात किंवा वापरात बदल; तसेच पुनर्बांधणी किंवा नवीन बांधकाम झाले, अशा मालमत्तांवर या प्रक्रियेचा विशेष परिणाम होणार आहे. त्यामुळे घरमालक, प्रतिनिधी, अभिकर्ते किंवा भोगवटाधारकांनी कर विभागात उपलब्ध नोंदींची पाहणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मालमत्ता कर निर्धारणासंदर्भातील नोंदी पालिकेच्या कर विभागात कार्यालयीन वेळेत पाहणीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. या नोंदींबाबत नागरिकांना काही हरकत अथवा आक्षेप असल्यास ६ ते २७ मार्च या कालावधीत लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.
दरम्यान, ज्यांना मालमत्तेसंदर्भात कोणतीही हरकत किंवा आक्षेप नाही, अशा नागरिकांना मालमत्ता कर बिलाची प्राप्ती व भरणा करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिली आहे.
यावर हरकती नोंदवता येणार
नोंदींमध्ये जमिनीचे किंवा इमारतीचे मूल्य चुकीचे ठरवल्यास, कर आकारणीमध्ये त्रुटी, घर क्रमांक किंवा पत्ता चुकीचा असल्यास, कर भरण्यास जबाबदार व्यक्तीचे नाव चुकीचे किंवा अपूर्ण असल्यास, इमारतीचा काही भाग पाडला असल्यास किंवा इमारत अस्तित्वात नसल्यास संबंधित हरकत नोंदवता येणार आहे. नागरिकांनी आपली हरकत किंवा तक्रार अर्ज स्वरूपात नागरिक सुविधा केंद्र (मुख्यालय) उल्हासनगर महापालिका, उल्हासनगर ३ येथे सादर करावा आणि त्याची पावती घ्यावी. प्रत्येक मालमत्तेसाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.