मुरबाड, ता. १२ (वार्ताहर) : शेंडेगाव येथील एकलव्य रेसिडेन्सीयल स्कूलमधील वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन तत्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या वतीने बुधवारी (ता. ११) शहापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपोषण करण्यात आले. या संदर्भात यापूर्वी ५ मार्चला परिषदेने प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, त्याची दखल न घेतल्याने अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला.
उपोषण सुरू झाल्यानंतर प्रकल्पाचे लेखाधिकारी पंढरीनाथ वेखंडे यांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलकांशी चर्चा केली. चर्चेनंतर येत्या आठ ते १० दिवसांत संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यात येईल, असे लेखी आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या वतीने उपोषण स्थगित करण्यात आले. आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद थोरात, गायकवाड मामा, शिंगे दादा यांसह अनेक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. याबद्दल परिषदेचे कोकण-महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मराडे यांनी सर्वांचे आभार मानले. दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार आठ ते १० दिवसांत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन न दिल्यास शहापूर येथील प्रकल्प कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मराडे यांनी दिला. या वेळी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णकुमार ठोंबरे, विनोद थोरात, गायकवाड, शिंगे, नारायण ठोंबरे, हरी हंबीर, राजू भला, पंढरी ठोंबरे, योगिता हेमाडे, निधी कदम आणि आरती फलक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.