१३, १४ मार्चला धोक्याचा इशारा
पालघर जिल्ह्यात उष्णतेची लाट, खबरदारीचे आवाहन
वाणगाव, ता. १२ (बातमीदार) : पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात १३, १४ मार्च रोजी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या काळात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू तालुक्यात पुढील दोन दिवस सरासरी ३४-३५ अंश सेल्सिअस तापमान राहणार आहे. तलासरी तालुक्यात कमाल तापमान ३७-३८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. वाडा, विक्रमगड, मोखाडा तसेच जव्हार तालुक्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस व किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांनी दुपारच्या वेळी शेतात काम करणे टाळावे तसेच कामाच्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन केले आहे.
-------------------------------
पाळीव जनावरांना धोका
वाढलेल्या तापमानामुळे आंबा बागेत फळगळ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी संध्याकाळी, सकाळी हलके पाणी द्यावे. जनावरांना सावलीत ठेवून थंड, जास्त पाणी द्यावे. शेडच्या छतावर गवताचे आच्छादन करा, जेणेकरून तापमान नियंत्रित राहील. तसेच जास्त उष्णतेमुळे कोंबडी पक्ष्यांवर जास्त परिणाम होतो. त्यामुळे शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावी, शेडचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पंख्यांची व्यवस्था करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.