मुंबई

कॅफेमधील डीप-फ्रायर मशीनला किरकोळ आग

CD

कॅफेमध्ये किरकोळ आग
ठाणे : येथील रुस्तमजी आझिओना इमारतीतील काकाऊ अँड क्रीम कॅफेमध्ये बुधवारी (ता. ११) इलेक्ट्रिक डीप-फ्रायर मशीनला किरकोळ आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व राबोडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले, तर कॅफेमध्ये काम करणारे चारही कर्मचारी वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
****

घोडबंदर रोड परिसरातील जंगलात आग
ठाणे : येथील घोडबंदर रोडवरील संजय गांधी नॅशनल पार्कच्या जंगलात बुधवारी (ता. ११) आग लागल्याची घटना समोर आली. ही माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून त्याबाबत वन विभागालाही कळविण्यात आले होते.
...........

घरासमोर खेळणाऱ्या चिमुरडीला टेम्पोची धडक
ठाणे : घरासमोर खेळत असताना तीन वर्षांच्या चिमुरडीला टेम्पोने धडक दिल्याची घटना (ता. ६) घडली. इकरा मिनु मलीक (वय ३) असे त्या चिमुरडीचे नाव असून, ती घरासमोर खेळत असताना टेम्पोचालक इरफान याने वेगाने वाहन चालवून तिला धडक दिली. या अपघातात इकराला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
.........

लोकल प्रवासात रिक्षाचालकाची रोकड लंपास
ठाणे : लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने कळवा येथील रिक्षाचालक मजाहिर सफी मोहम्मद अंसारी (वय ४६) यांच्या खिशातील साडेअकरा हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ते ११ मार्च रोजी ठाणे रेल्वे स्थानकावरून ११.५५ वाजताच्या सीएसएमटी लोकलमध्ये चढताना त्यांच्या खिशातील साडेअकरा हजारांची रोकड चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
...............

एका प्रवाशाचे दोन मोबाईल चोरीला
ठाणे : लोकलमध्ये चढताना गर्दीत चोरट्याने समीरण सासमल (वय ४१) यांचे दोन महागडे मोबाईल चोरल्याची घटना दिवा रेल्वे स्थानकावर घडली. एक लाख दोन हजार ९९९ रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
........
अल्पवयीन मुलगी बेपत्ता
ठाणे : घोडबंदर रोड परिसरातून १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. ही मुलगी मंगळवारी (ता. १०) कामावर जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेतला, परंतु ती कुठेही आढळली नाही. त्या अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..............

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
ठाणे : मुंब्रा-पनवेल रोडवरील पिंपरी गाव परिसरात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार इब्राहिम सुलतान शेख (२४) याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी (ता. ९) सकाळी दुचाकीवरून जात असताना कंटेनरचालक धर्मेंद्र चौधरी याने निष्काळजीने वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शेख यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT