मुंबई

परीक्षाकाळात शाळांचा कारभार रामभरोसे

CD

परीक्षाकाळात शाळांचा कारभार रामभरोसे!
जव्हारमधील शिक्षकांची मतदार यादीच्या पुनरीक्षणासाठी नेमणूक

जव्हार, ता. १२ (बातमीदार) ः निवडणूक आयोगाने राज्यात मतदार यादीच्या एसआयआरअंतर्गत पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. यासाठी शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहेत; पण यामुळे ग्रामीण भागात परीक्षा काळातच शाळांचा कारभार रामभरोसे आहे.
जव्हार तालुक्यात अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. एकाच शाळेतील दोन किंवा अधिक शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत संबंधित शिक्षक पूर्णवेळ निवडणूक कामासाठी कार्यमुक्त झाल्यास शाळा चालविणे कठीण होत आहे. विशेषतः इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची संख्या मर्यादित असते. काही शाळांमध्ये फक्त दोन किंवा तीन शिक्षकांवर संपूर्ण शाळेचे कामकाज चालते. अशा शाळांमधील शिक्षक बीएलओ म्हणून कार्यमुक्त झाल्यास उर्वरित शिक्षकांवर सर्व वर्गांचे अध्यापन, प्रशासकीय कामे आणि शाळेचे व्यवस्थापनाचा मोठा ताण पडतो. परिणामी, विद्यार्थ्यांचे नियमित अध्यापन बाधित होण्याची शक्यता आहे.
----------------------------
कायद्याची पायमल्ली
राईट टू एज्युकेशन ॲक्ट २००९ (आरटीई) मधील शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तराच्या तरतुदींशी ही परिस्थिती विसंगत ठरू शकते. या कायद्यानुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार, सातत्यपूर्ण शिक्षण देणे, ही राज्याची जबाबदारी आहे; परंतु शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर निवडणूक कामात गुंतवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
--------------------------
अन्य पर्यांयाचा विचार गरजेचा
बीएलओ म्हणून ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, तसेच इतर शासकीय कर्मचारी यांचीही नियुक्ती करण्याची तरतूद आहे. अशा कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात नियुक्ती केल्यास शिक्षकांवरील ताण कमी होईल. या बाबींचा गांभीर्याने विचार करून बीएलओ नियुक्तीत विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा समतोल वापर करणे आवश्यक आहे. असे केल्यास मतदार यादी पुनरीक्षणाचे कामही सुरळीत पार पडेल, तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान येईल.
-------------------------------
जव्हार तालुक्यात शिक्षणाद्वारे येथील कुटुंबांची प्रगती झाली आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांचे काम अतिशय महत्त्वाचे आहे; मात्र शिक्षकांवर सध्या मतदानाची कामे लागल्याने शालेय अध्यापनाला पूर्ण वेळ देता येत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
- रवींद्र शेवाळे, पालक
------------------------
जव्हार तालुक्यातील एक किंवा दोन शिक्षक असलेल्या शाळेमधील शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अशा शाळांची शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांवर अतिरिक्त भार देऊ नये.
- सखाराम पवार, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT