मुंबई

गॅस संकटामुळे केटरर्स व्यवसायिकांची कोंडी

CD

गॅस संकटामुळे कॅटरर्सची कोंडी
लग्नकार्यासह घरगुती कार्यक्रमांच्या ऑर्डर रद्द
उल्हासनगर, ता. १४ (वार्ताहर) : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा भीषण फटका आता उल्हासनगरमधील कॅटरिंग व्यवसायाला बसू लागला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने अनेक कॅटरर्सना लग्नसमारंभ, वाढदिवस, डोहाळे जेवण आणि बारशासारख्या शुभकार्याच्या जेवणाच्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे. यामुळे कोट्यवधींच्या उलाढालीवर परिणाम झाला असून संबंधित कामगारांवरही बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

कॅटरिंग व्यवसायात जेवण वेळेवर तयार होणे महत्त्वाचे असते. मोठ्या कार्यक्रमांसाठी एकाच वेळी अनेक सिलिंडर लागतात; मात्र सध्या गॅसच्या वाढत्या किमती आणि अनियमित पुरवठ्यामुळे कॅटरर्स धास्तावले आहेत. ऑर्डर स्वीकारल्यानंतर ऐनवेळी गॅस मिळाला नाही, तर कार्यक्रमात मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि आपली प्रतिष्ठा मलिन होईल, या भीतीपोटी अनेक कॅटरर्सनी आधीच ऑर्डर नाकारण्यास सुरुवात केली आहे.

उल्हासनगरमधील हा व्यवसाय केवळ कॅटरर्सपुरता मर्यादित नाही. गॅस संकटामुळे भांडी पुरवठादार, डेकोरेटर्स, वेटर आणि इतर रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या उत्पन्नावरही गदा आली आहे. कौटुंबिक सोहळ्यांसोबतच वर्षश्राद्ध आणि पुण्यतिथीसारख्या सामाजिक कार्यक्रमांच्या नियोजनावरही याचा परिणाम होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

व्यावसायिकांची मागणी
सरकारने व्यावसायिक गॅसचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा आणि भरमसाट वाढलेल्या दरांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी कॅटरिंग व्यावसायिकांकडून केली जात आहे.

कॅटरिंग व्यवसाय पूर्णपणे गॅसवर अवलंबून असतो. सध्या व्यावसायिक गॅस वेळेवर मिळत नाही आणि किमतीही वाढल्या आहेत. लग्नसमारंभ, वाढदिवस आणि डोहाळे जेवणासारख्या ऑर्डर स्वीकारताना आता दहा वेळा विचार करावा लागत आहे. गॅसअभावी ऑर्डर रद्द कराव्या लागत असल्याने आर्थिक नुकसानासोबतच ग्राहकांशी असलेले संबंधही बिघडत आहेत.
- सागर सोनार, वंदना कॅटरर्स, उल्हासनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

वाहन नोंदणी-लायसन्सची माहिती आता व्हॉट्सअ‍ॅपवर; परिवहन विभागाची नवी सेवा, २४x७ चॅटबॉट सुरू होणार

Sangli Gas Cylinder : ‘आमचा गॅस सिलिंडर कुणी पळवला?’ ग्राहकांचा संताप एजन्सींचा काळा बाजार, सर्वत्र लागल्या रांगा

Education News : पुढील तीन वर्षांत पहिली ते बारावीचा कायापालट; जाणून घ्या तुमच्या पाल्याच्या इयत्तेचा नंबर कधी?

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

SCROLL FOR NEXT