मुंबई

कमी पाहुणे मंडळींमध्ये समारंभ

CD

बेलापूर, ता. १२ (बातमीदार) : मार्च उजाडला की सुरू होते ती लगीन घाई. मात्र यंदा विघ्न आहे ते आखाती देशांमधील सुरू असणाऱ्या युद्धाचे. या युद्धामुळे भारतात गॅस दरवाढ, अल्प पुरवठा सुरू असून विविध हॉटेल व्यावसायिक, केटरर्स अडचणीत सापडले आहेत. बहुतांश हॉटेल्स बंद ठेवण्यात आले आहेत, तर अनेक लग्न सोहळ्यात कमी पाहुण्यामध्ये समारंभ साजरा होत आहे, तर अनेकांनी आपले लग्न कार्य पुढे ढकलले असल्याचे नवी मुंबई वेडिंग असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरात सर्वत्र सध्या चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. घरगुती एलपीजी आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. यामध्ये घरगुती एलपीजीची किंमत ६० रुपयांनी वाढली असून नवी मुंबई शहरातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच पाच-सहा महिने आधी लग्नाचे मुहूर्त काढून हॉल, मैदाने बुकिंग करणाऱ्या नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. गॅस पुरवठा अभावी अनेक केटरर्स अडचणीत सापडल्याने कमी पाहण्यात लग्न करावे अन्यथा मुहूर्त पुढे ढकलावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

गॅस दरवाढ, हॉटेल व्यावसायिकांना गॅस बुकिंग मिळत नसल्याने आम्हा केटरर्स व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. लग्नाचा मुहूर्त तोंडावर असताना अनेकांनी लग्न पुढे ढकलली आहेत. बहुतांश लोकांनी आपली पाहुणे मंडळींची संख्या घटवून लग्न करण्याचे ठरवले आहे. याचा संपूर्ण भार आमच्यावर आला आहे, असे नवी मुंबई वेडिंग असोसिएशनचे कैलास मुद्रास यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT