तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई परिसरात घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संभाव्य टंचाईची भीती निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिकांनी आधीच गॅस सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीसमोर रांगा लावल्या आहेत.
वाशी, नेरूळ, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे आणि बेलापूर या भागातील गॅस एजन्सीसमोर सकाळपासूनच नागरिकांची लांबलचक रांग दिसून येत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी अतिरिक्त सिलिंडर मिळवण्यासाठीही धाव घेतली आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाल्याचे दिसत आहे. गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सध्या गॅसचा पुरवठा नियमित सुरू असून कोणतीही अधिकृत टंचाई जाहीर झालेली नाही, मात्र समाज माध्यमांवर फिरणाऱ्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून त्याचा परिणाम म्हणून अचानक मागणी वाढली आहे.
काही नागरिकांनी सांगितले की, युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो अशी भीती वाटत आहे. त्यामुळे घरात गॅस संपण्याआधीच अतिरिक्त सिलिंडर ठेवण्यासाठी आम्ही एजन्सीकडे आलो आहोत. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गरजेपेक्षा जास्त सिलिंडर खरेदी करू नयेत, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.