मुंबई

अर्धशतकानंतर पुन्हा शाळेत भेटले मित्र

CD

अर्धशतकानंतर शाळेत पुन्हा रंगली मित्रांची मैफल
टिळकनगर विद्यामंदिरच्या १९७६ बॅचचा सुवर्ण मेळावा
डोंबिवली, ता. १२ : शाळा सोडून ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने टिळकनगर विद्यामंदिरच्या १९७६च्या दहावीच्या बॅचचा अनोखा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. पेंढरकर सभागृहात आयोजित या सुवर्णमहोत्सवी संमेलनासाठी देश-विदेशातून माजी विद्यार्थी एकत्र आले होते. ५० वर्षांनंतर मित्र-मैत्रिणींची भेट झाल्याने संपूर्ण वातावरण भावुक झाले होते.

मेळाव्यासाठी ८० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. डोंबिवली, कल्याण, पुणे, नाशिक, कोल्हापूर यांसह बंगळूर आणि निपाणी येथूनही विद्यार्थी आवर्जून आले होते. विशेष म्हणजे, एका विद्यार्थिनीने या स्नेहमिलनासाठी थेट इस्रायलवरून हजेरी लावली होती. अत्तर, गुलाबपुष्प आणि सनईच्या सुरात सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच दिवंगत शिक्षक आणि मित्रांना श्रद्धांजली अर्पण करून, शालेय जीवनातील किस्से सांगत हा सोहळा रंगला. भविष्यात शाळेच्या हिरकमहोत्सवी वर्षातही असाच उत्साह टिकवून ठेवण्याचा निर्धार या वेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

शाळेप्रती कृतज्ञता : १.५१ लाखांचा निधी सुपूर्द
केवळ आठवणींना उजाळा न देता, आपल्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या शाळेप्रती विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. १९७६ च्या बॅचतर्फे एक लाख ५१ हजार रुपयांचा ‘कृतज्ञता निधी’ शाळेकडे सुपूर्द करण्यात आला. या निधीच्या व्याजातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच, ज्येष्ठ शिक्षक जगदीश भंडारे यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.

‘वॉल ऑफ फेम’मध्ये स्थान
टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आशीर्वाद बोंद्रे यांनी शाळेच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली. शाळेतील ‘वॉल ऑफ फेम’ या उपक्रमात १९७६च्या बॅचमधील दोन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी या वेळी अभिमानाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT