भाकरी थापत काँग्रेसचा अनोखा निषेध
गॅस दरवाढीविरोधात कल्याण तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन
डोंबिवली, ता. १२ : देशात वाढलेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांविरोधात काँग्रेसच्या वतीने गुरुवारी कल्याण येथील तहसीलदार कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी चूल पेटवून आणि प्रत्यक्ष भाकरी थापत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला. महागाई कमी करा, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि युद्धाच्या नावाखाली गॅस सिलिंडरच्या दरात जी वाढ करण्यात आली आहे, त्याचा मोठा फटका सामान्य गृहिणींना बसत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. वाढत्या महागाईमुळे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले असून, आता सर्वसामान्यांना गॅसवर स्वयंपाक करणेही परवडेनासे झाले आहे, अशी टीका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर, नगरसेविका कांचन कुलकर्णी, प्रदेश महासचिव नवीन सिंग, ज्येष्ठ नेते मामा पगारे, मुन्ना तिवारी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चक्का जामचा इशारा
सरकारने गॅस दरवाढ तातडीने मागे घ्यावी आणि बाजारात सिलिंडरचा सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीवर लवकरात लवकर निर्णय न झाल्यास, येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल आणि ‘चक्का जाम’ करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.