देशहितापेक्षा राजकारणाला प्राधान्य देऊ नये
खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची टीका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : जागतिक परिस्थितीत अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र दिसत आहे. अशा वेळी देशांतर्गत मतभेद बाजूला ठेवून भारताने एकसंघ असल्याचा संदेश जगाला देणे आवश्यक आहे. मात्र, काही विरोधी पक्ष पंतप्रधानांवर टीका करताना देशहिताचाही विचार करत नाहीत, अशी टीका शिंदे गटाच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी केली.
राज्यसभेचे खासदारकीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर गुरुवारी (ता. १२) त्या ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. एका सामान्य शिवसैनिकाला राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असल्याचे सांगत, दिघेंच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आपण आनंद आश्रमात आलो असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. सध्या जगभरात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम विविध क्षेत्रांवर होत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील लाडक्या बहिणींना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, शिवसेनेबाबत जनतेनेच आपला कौल दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून शिवसेनेचे सात खासदार निवडून आले, तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३२ जागांवर विजय मिळाला. त्यामुळे जनतेने स्पष्ट निर्णय दिला असतानाही काही नेत्यांना तो स्वीकारणे कठीण जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.