मुंबई

आरपीआयचे महापौरांना निवेदन

CD

आरपीआयचे महापौरांना निवेदन
नेरूळ, ता. १२ (बातमीदार) : नवी मुंबईतील विविध नागरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आरपीआय (आ.) मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी महापौर सुजाता पाटील यांना निवेदन दिले आहे. शहरातील सहा प्रमुख प्रश्नांकडे लक्ष वेधत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, वाशी येथे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांनी सामाजिक विकासासाठी सिडको व एमआयडीसीकडून महापालिकेला मिळालेल्या भूखंडांची विक्री विकासकांना झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच शहरात फेरीवाले धोरण नसल्यामुळे वाढत असलेल्या बकालपणाकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. नवी मुंबईसाठी स्वतंत्र फेरीवाले धोरण निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय जुन्या इमारतींच्या पुनर्विकासामुळे वाढलेल्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर विभागनिहाय पार्किंग व्यवस्था उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. या सर्व मागण्या येणाऱ्या महासभेत अग्रक्रमाने मांडाव्यात, अशी अपेक्षा मिरजे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Tamil Nadu Election: विजयच्या पक्षात भावनिक कथा! तिकीट मिळाल्यावर रडलेला ड्रायव्हरचा मुलगा जिंकला की हरला? उमेदवाराची कहाणी चर्चेत

मला दाखव, काय लिहिले आहेस? Raghu Sharma ने विकेट घेताच खिशातून पेपर काढला, सूर्यकुमार यादव वाचायला गेला; भावनिक संदेश...

Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

SCROLL FOR NEXT